केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारावर शिवसेना नाराज... सामनामधुन टिका.

रिपोर्टर... केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार करण्यात आला. पण यावेळी शिवसेनेच्या पदरी एकही मंत्रिपद पडलं नाही. यावर आज शिवसेनेने सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे.
'मंत्रिमंडळाचे विस्तार हे पत्ते पिसण्यासारखे असतात. कधी एखादा जोकर किंवा गुलाम राजा होईल व राजाची अवस्था गुलामासारखी होईल ते सांगता येत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ही भारतीय जनता पक्षाची राजकीय गरज होती. ती पूर्ण  केली गेली  आहे'. अशी टीका सामनातून आज करण्यात आली आहे. आज तीन वर्ष झाले पण अजूनही देश अच्छे दिनचा चमत्कार होण्याच्या प्रतिक्षेत आहे असंही या लेखात म्हटलं गेलंय.
निवडणुका जिंकणे आणि सरकारे बनवणे हाच सध्या राजकीय, पण राष्ट्रीय खेळ झालाय आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आता फार चर्चा न केलेलीच बरी असं मत सामनामध्ये  व्यक्त करण्यात आलंय.