लेडीज क्लब, उस्मानाबादच्या वतीने दांडिया महोत्सवाचे आयोजनरिपोर्टर...लेडीज क्लब, उस्मानाबादच्या वतीने या नवरात्रात उस्मानाबाद येथे 'दांडिया महोत्सव-२०१७' चे आयोजन करण्यात आले आहे. दि.२८ सप्टेंबर रोजी 'ती सध्या काय करते' फेम तेजश्री प्रधान, आर्या आंबेकर व अभिनय बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर दि.२९ सप्टेंबर रोजी मराठी चित्रपट इतिहासातील सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरलेल्या 'सैराट' मधील आर्ची व परशाची भूमिका साकारलेले रिंकू राजगुरू व आकाश ठोसर हे उपस्थित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. तसेच दि.३० सप्टेंबर रोजी दूरचित्रवाहिनीतील प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला' फेम अंजली व राणादा यांची उपस्थिती राहणार आहे. लेडीज क्लब, उस्मानाबाद येथील प्रांगणात सायं ०६ ते १० यावेळेत होणाऱ्या या दांडिया महोत्सवाचे उद्धघाटन कळंब-उस्मानाबादचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.  
तरी या दांडिया महोत्सवास शहर व परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून आयोजकांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन जि.प.उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.