.मुख्यमंत्री गणपती दर्शणासाठी नारायण राणेच्या घरी...


मुख्यमंत्री बाप्पाच्या दर्शनासाठी थेट राणेंच्या घरी !

रिपोर्टर.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री नारायण राणेंच्या घरी जाऊनं बाप्पांचं दर्शन घेतलं. नारायण राणेंनी कालच मुख्यमंत्र्यांना गणपतीच्या दर्शनाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं.नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राणेंनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणं आणि मुख्यमंत्र्यांचं राणेंच्या घरी जाण्याला महत्त्व आलंय. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केलाय.