राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

.Image result for sadabhau khot minister रिपोर्टर..राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ४ सदस्यांच्या चौकशी समितीनं आज निर्णय जाहीर केला. सदाभाऊंच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्हं आहे, त्यांना सत्ता उपभोगण्यात जास्त रस आहे.पुण्तांब्याहुन  सुरू झालेल्या शेतकरी संपात सदाभाऊंनी फूट पाडली, असे त्यांच्यावर प्रमुख आरोप आहेत.स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी देशभरातल्या १५० संघटना एकत्र आल्या मात्र केंद्राचा विषय म्हणून सदाभाऊ आलिप्त राहिले. त्यांना मलबार हिलच्या सत्तासुंदरीत जास्त रस आहे. त्यांच्यामुळे स्वाभिनमानीची बदनामी झालीय, अशी पक्षाची भूमिका आहे.