बाळापूर विभागातील अवैद्य व्यवसाय एसडीपीओच्या रडारवर
*एसडीपीओ सोहेल शेख यांच्या पथकाची कारवाई
रिपोर्टर... बाळापूर पो.स्टे.अंतर्गत स्थानिक अंजूमन बाजार येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या विशेष पथकाने व्हिडीओ गेम, व आकड्याच्या जुगारावर मारलेल्या छाप्यात व्हिडीओ गेम मशीन,नगदी रक्कमसह १०हजार ८०० रुपयांचे साहित्य जप्त करीत जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,बाळापूर येथे अवैध दारू, वरली,मटका,जुगार,व्यवसाय वर पोलीसांनी अंकूश लावीत अवैद्य व्यवसाय पुन्हा डोके वर काढणार याची दक्षता घेतले असतांनाच
बाळापूर येथील अंजूमन बाजारात अवैद्य पणे व्हिडीओ गेम मशीन व आकड्याच्या बोर्डावर पैसे लावून जूगार होत असल्याची माहीती प्राप्त होताच बाळापूर कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांचे विशेष पथकातील पीएसआय सुर्यवंशी व पोलीस कर्मचारी हरिदास अवचार,विजय चव्हाण,संजय सिरसाट,
डोईफोडे,संजय कुंभार यांनी अचूकपणे छापा मारीत जुगार खेळत असलेल्या आरोपी प्रकाश धुऱ्हाटे रा.अकोला व आरोपी चुन्ना रा. बाळापूर यांना अटक करीत व्हिडीओ मशीन व नगदी १०हजार८०० रुपयांचे साहित्य जप्त केले.
Attachments area