२५ गोवंशासह २६ लाखाचा माल जप्त..•अकोला पोलिसांची कारवाई....

अकोला:-जुने शहरातील गंगानगर १ मध्ये हत्या करण्यासाठी आणलेले ३० गोवंश ट्रक सोबत पोलिसांनी पकडले आहे.या कारवाई मध्ये ट्रक सोबत २६ लाखाचा अवैध माल देखील जप्त करण्यात आला.सरकारने गोवंश हत्येप्रकरणी बंदी घोषित केली आहे परंतु हे प्रकार खुलेआम सुरु असल्याचे लक्षात येते आहे.जिल्ह्यातील बाळापूर,बार्शीटाकळी,रामदास पेठ,डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या काही विशेष भागात रोज कितीतरी गोवंश मारले जात आहेत.या अवैध धंद्यांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यांना असून सुद्धा कोणतीच कारवाई का केली जात नाही हा मोठा प्रश्न आहे.शुक्रवारी जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कालासागर यांना मिळालेल्या माहितीनुसार जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गंगानगर १ मे मारण्यासाठी गोवंश आणले जात आहे.या माहितीनुसार त्यांनी विशेष पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेश मिळताच या पथकाने साफळा रचून नागपूर हुन आलेल्या ट्रक क्रं एम.एच ४० एम ५१५७ ला थांबवुन गंगानगर १ मध्ये तपास केला.तपासादरम्यान पथकाला ३० गोवंश खचाखच भरलेले दिसले.ज्यामुळे पथकाने ट्रक ला जप्त करत नागपूर संघर्व नगर निवासी २४ वर्षीय शेख साबीर शेख मोहम्मद,कामठी मोदी पडाव निवासी २७ वर्षीय सैय्यद इराफांस सैय्यद चांद,पिली नदी निवासी अब्दुल नदीम अब्दुल रहीम,मोती बाग भीमसागर निवासी २७ वर्षीय मोहम्मद ईस्माईल कुरैशी यांना अटक केली.पोलिसांनी आरोपी जवळ २० लाखाचा ट्रक व ०६ लाखांचे गोवंशन जप्त केले.
----------------------