अकोल्यात वाहतुकीचे नियमांबाबत जनजागृती रँली
रिपोर्टर.. सचिन मुर्तडकर
अकोला.
 वाहनांची दिवसें दिवस वाढ होत असून वाहन धारकां द्वारे वाहतुक नियमाचे काटेकोर पालन होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.त्यातच वाहनांची कोंडी झाल्याने रहदारी ला अडथळा निर्माण होण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने यावर प्रभावी उपाय योजना होण्याच्या दृष्टीने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचे संकल्पनेतून शहर वाहतूक नियंत्रण शाखा व ९४.३ माय एफएम रेडिओ व शिवाजी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांबाबत जनजागृती रँली काढण्यात आली त्यामध्ये शहरातील मुख्य चौक नेहरू पार्क,अशोक वाटिका, जीपीओ चौक, बस स्थानक, सिव्हिल लाईन चौक टॉवर चौक, या मुख्य मार्गावर रॅली आयोजीत करण्यात आली होती.रँली मध्ये पथ नाट्य,पोस्टर बँनर,हँडविल, पॉम्प्लेट वितरीत करून सुचना फलका द्वारे जनजागृती करण्यात आली.वाहतुक नियम जनजागृती च्या कार्यक्रमामध्ये ९४.३ माय एफएम आरजे अभय गायकवाड,कमल कोटक, पियुष देशमुख, विशाल नंदगवडी व शिवाजी कॉलेज चे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या रँली चे माध्यमातून वाहन धारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे,अति वेगाने वाहने चालवू नयेत,सिग्नलचे नियम पाळावे,मद्य सेवन करून वाहने चालवू नयेत,विना लायसेन्स व योग्य कागदपत्रे शिवाय वाहन चालवू नये, परमीट चे उल्लंघन करू नये, प्रवासी क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये याबाबत सूचना देण्यात आल्या या रँली यानंतर समारोप करण्यात आला.यावेळी पोलीस वाहतुक नियंञण विभागाचे पीएसआय विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.