
अक्षय जोशी रिपोर्टर... अकोला-राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियाना अंतर्गत विद्या भरती अकोला तर्फे आज शहरात एका मोठ्या स्वदेशी जागरण पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.काही दिवसांपासून चीन व भारत यांच्या मध्ये सुरु असलेल्या तणाव पूर्ण स्थिती पाहता आणि चायनीज मालामुळे होणारे भारतीयांचे नुकसान यावर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे विदर्भ प्रांत संयोजक सुभाष लोहे यांनी मार्गदर्शन करत चीन च्या वस्तू विकत घेऊन आंतकवादी कारवायांना मदत करण्यापेक्षा भारतीय वास्तुं विकत घेऊन आपल्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना केले.देशाच्या एकूण आर्थिक उलाढालीत स्वदेशी वस्तूंच्या विक्रीबाबतची टक्केवारी घसरते आहे.प्रत्येक ३० भारतीयांच्यामागे ०१ नागरिक चिनी वस्तूंच्या खरेदीसाठी आग्रही असल्याचे दिसून येते आहे.आज भारतीय बाजारपेठेत जेवढ्या चिनी वस्तू आहेत त्या जर आपण खरेदी केल्या नाही तर चीनची अर्थव्यवस्था कमजोर होईल.त्यामुळे स्वदेशीचाच उपयोग करणे योग्य असेही ते म्हणाले.
चीन हा पाकिस्तानचा समर्थक आहे भारतीय बाजारपेठेत विकला जाणार चायनीज माला द्वारे निर्माण होणार पैसा हा चीन पाकिस्तानला भारता विरोधात आतंकवादी कारवाया करण्या करिता पुरवते आणि अश्या चायनीज मालाची मोठ्या प्रमाणत विक्री ही भारतीय बाजारपेठेत होते म्हणजे आपणच आपल्या देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या पाकिस्तानची मदत करत आहोत त्यामुळे चायनीज मालाची खरेदी आपण त्वरीत थांबविले पाहिजे व आपल्या दिनचर्ये मध्ये जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रा.विवेक बिडवई यांनी केले.उदघाटन कार्यक्रमा करीता मंचावर रा.स्व.संघाचे विभाग सह संघचालक प्रा.नरेंद्र देशपांडे,महापौर विजय अग्रवाल राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे प्रांत प्रमुख सुभाष लोहे,विद्या भारतीचे पश्चिम विदर्भ सह प्रमुख समीर थोडगे उपस्थित होते.यारॅली दरम्यान अकोला जिल्ह्याचे स्थानिक निवासी उपजिल्हाधिकारी यांना चायनीज मालाची विक्री त्वरित बंद करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन ही देण्यात आले.
या पायदळ रॅलीला सकाळी ११:०० वाजता स्थानिक बी.आर.हायस्कुल येथुन सुरवात होऊन माहेश्वरी भवन मार्गे,मेन हॉस्पिटल,जिल्हाधिकारी कार्यालय,पंचायत समिती,वसंत टॉकीज मार्गे सिटी कोतवाली,गांधी चौक,चांदेकर भवन,नवीन बस स्टँड मार्गे पोस्ट ऑफिस पासून समारोप बी.आर.हायस्कुल येथे करण्यात आला.यावेळी मार्केट परिसरात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.या पायदळ रॅली मध्ये शहरातील भारत विद्यालय,भिकामचंद खंडेलवाल विद्यालय,हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंट,अमृत कलश विद्यालय,मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय,विवेकानंद इंग्लिश स्कुल,खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कुल,समर्थ विद्यालय गायगाव या शाळेतील सुमारे ७००च्या वर विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणत सहभाग घेऊन चायनीज मालाची विक्री बंद करण्याच्या समर्थनात घोषणा बाजी केली या पायदळ रॅली च्या आयोजनात विद्या भारतीच्या साधना बडगे,पल्लवी कुलकर्णी,शरद वाघ,अंकुश गावंडे,गिरीश कानडे,व जिल्हा व नगर पदाधिकारी,राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे जिल्हा संयोजक विनोद जकाते, नगर संयोजक स्वानंद कोंडलीकर,वैभव दीक्षित,उदय थोरात,दीपक मायी,महेंद्र कविश्वर आदी सहभागी होते.
-----------------------