अकोला महानगरात मराठा क्रांती मोर्चाची जनजागृती रँली


* ९ ऑगष्ट ला मुंबई येथे होणार मराठा क्रांती मोर्चा.

सकल मराठा समाजाच्या वतीने ९ ऑगष्ट रोजी मुंबई येथे राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत जिल्ह्यांमध्ये जणजागृती व्हावी या दृष्टीकोनातून अकोला येथे अकोला जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे वतीने ६ ऑगष्ट रोजी भव्य दुचाकी रँली काढण्यात आली.
अकोला महानगरातील मुख्य मार्गावरून दुचाकी द्वारे शिस्तबध्द पध्दतीने सकाळी ११ वाजता जनजागृती रँली आयोजीत करण्यात आली होती यामध्ये महानगरातील जि.प.कर्मचारी कल्याण भवन सिव्हिल लाईन चौक येथून रँलीस सुरूवात होऊन रतनलाल प्लॉट,दुर्गा चौक,अग्रसेन चौक,टॉवर चौक,मदनलाल धिंग्रा चौक,खुले नाट्यगृह चौक,मनपा गांधी चौक,सिटी कोतवाली चौक,होमगार्ड ऑफीस ते तहसिल चौक,जिल्हाधिकारी कार्यालय चौक,जिल्हा रुग्णालय ते अशोक वाटीका चौक,दक्षता नगर,सिंधी कँम्प,खदान ते कौलखेड चौक,रिंग रोड ते तुकाराम चौक,सहकार नगर चौक,पॉवर हाऊस,नेहरू पार्क ते सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अशी महानगर परिक्रमा करून जि.प.कर्मचारी कल्याण भवन सिव्हिल लाईन चौक येथे मार्गदर्शनानंतर समारोप करण्यात आला.या जणजागृती रँली मध्ये हजारो मराठा समाज सामील झाला होता.शहराच्या विविध प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत ही रँली निघाली रँलीमुळे रहदारी ला अडथळा व ञास होऊ नये याकरीता २-२ च्या रांग या पध्दतीने रँली संपन्न झाली.यावेळी शहर वाहतूक शाखेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले