चान्नी पो.स्टे.अंतर्गत येत असलेल्या आलेगाव येथे पोलीस चौकी असून गत काही दिवसांमध्ये परिसरामध्ये वाढते अवैद्य धंदे,खुलेआमपणे विकल्या जाणारी दारू,चोरी,चिडीमारी,शुल्लक कारणांवरून होणाऱ्या भांडणांचे प्रमाण सातत्याने वाढीस लागले असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.या ठिकाणी पिएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याची अत्यंत आवश्यकता असल्याने येथे स्वतंञ पोलीस उपनिरिक्षक नेमण्यात यावी अशी मागणी होत आहे.
चान्नी पो.स्टे. हद्दीतील आलेगाव येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता पोलीस चौकी देण्यात आली आहे.परंतू या ठिकाणी अद्याप पावेतो स्वतंञ पिएसआय दर्जा चा अधिकारी देण्यात न आल्याने सर्व सामान्यांना तात्काळ न्याय मिळण्यास विलंब होत आहे.तक्रारींवर तातडीने कारवाई होत नसल्याने तसेच पोलीस चौकी असतांना चान्नी पो.स्टे.येथे सारखी पायपीट करावी लागत आहे.त्यामुळे आलेगाव पोलीस चौकी परिसरातील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अमंलबजावणी व्हावी याकरीता आलेगाव येथे पोलीस चौकी असल्याने येथे स्वतंञ पोलीस उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी आलेगाव पोलीस चौकी परिसरातील गावातील नागरिकांनी मागणी केली आहे.
तरी जिल्हा पोलीस अधिक्षक कलासागर यांनी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोणातून गांभीर्याने लक्ष देवून याठिकाणी स्वतंञ पिएसआय दर्जाचा अधिकारी द्यावा अशी आलेगाव पोलीस चौकी परिसरातील नागरीकांनी मागणी केली आहे.