शेतकरी म्हणतात माती परिक्षण म्हणजे काय?.. मातीपरिक्षणाचे लॅब मात्र सत्ताधार्याचे...रिपोर्टर ..शेतीसाठी मातीपरिक्षण अतिशय महत्वाचा घटक आसताना देखील उस्मानाबाद जिल्हयामध्ये ग्रामीण भागातील शेतकर्याना मातीपरिक्षण म्हणजे काय हेच माहीत नाही.जिल्हाकृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष आसल्याने शेतकरी पारंपारीक पध्दतीनेच खताची पेरणी करून नुकसानीला समोरे जात आहे.पतंप्रधान माती परिक्षण योजना सुध्दा नुसती कागदावरच आसल्याचे दिसत आहे.

शेतकर्यावर निसर्गाची नेहमी आवकृपा आल्याने मातीपरिक्षण करून शेतकर्याना आर्थिक नुकसानीपासुन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मातीपरिक्षण योजनेची सुरूवात केली आहे. परंतु या योजनेचा शेतकर्याना काय फायदा होतोय की नाही याकडे कुनाचे ही लक्ष आल्याचे दिसत नाही. उस्मानाबाद जिल्हयामध्ये शासकीय माती​परिक्षण कार्यालयाकडे मर्यादेपेक्षा जास्त काम होत आसल्याने जिल्हयातील प्रकाश आॅग्रो उस्मानाबाद, लोकमंगल ग्रुप सेलापुर आणि सिध्दीविनायक ग्रुप उस्मानाबाद या संस्थाना मातीपरिक्षणाचे काम देण्यात आले आहे. सत्ताधार्याच्या एवढया संस्था मतीपरिक्षणाचे काम करतात तरी देखील जिल्हयातील शेतकर्याना मातीपरिक्षण म्हणजे काय हे  माहीत नाही. आणि महत्वचे म्हणजे मातीपरिक्षणासाठी शेतातील मातीचे नमुने आणण्याचे काम कृषी विभागातील कृषी सहययकाच्या मार्फत केले जाते. मातीचे नमुने आनण्यामध्ये कृषी सहययक लापरवाही करतात त्यामुळे ज्या काही प्रगत शेतकर्याना माती परिक्षणाचे रिपोर्ट दिले जातात. त्यावर त्यांचा विश्वास बसत नसल्याने ते शेतकरी स्वखर्चाने जावुन खात्रीच्या ठीकाणी मातीपरिक्षण करून घेतात. मग पंतप्रधान माती परिक्षण योजनेचा नेमक लाभ शेतकर्याना आहे की खाजगी लॅब चालकांना आहे.आसा प्रश्न उपस्थित होत आहे. मातीपरिक्षणाची माहीती आणि फायदे जर जनजाग्रती करून शेतकर्यापर्यत पोहचवीले तर आर्थिक नुकसानीत आसलेल्या शेकर्याना मदत होईल. आणि मातीचे योग्य रिपोर्ट शेतकर्याना दिले तर नक्कीच त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होईल.