स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करा; उनखेड ग्रामस्थांची मागणी

                     
अकोला'  संदीप सोनोने  ''मूर्तिजापुर तालुक्यातील उनखेड येथील ग्रामस्थांनी गावातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभार तसेच सर्व सामान्याच्या हक्काचे असलेल्या सरकारी स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित ठेवत असल्याने  जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे  अकोला यांना २४ ऑगष्ट ला मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले असून सरकारी स्वस्त धान्य वितरका चा परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
        उनखेड येथे घोरमोडे यांचेकडे सरकारी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना असून त्यांनी मनमानी कारभार चालवित गरीबांच्या हक्काचे असलेल्या धान्याच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार चालविल्याची तक्रार उनखेड वासीयांची असून स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरकाने खुल्या बाजारपेठे मध्ये विकण्याचा प्रकार करीत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून केला आहे.सरकारी स्वस्त धान्य वितरकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी जिल्हा पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई व्हावी याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे  अकोला यांना निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे.