नितीन गडकरी यांचा मुख्यमंत्र्यांच्या केंद्रात एंट्रीबाबत नकार;


मुख्यमंत्र्यांमध्ये केंद्रात काम करण्याची क्षमता,पण...-नितीन गडकरी

 रिपोर्टर.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार नाहीत. त्यांची काम करण्याची क्षमता आहे पण राज्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे असं म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही मुख्यमंत्र्यांच्या केंद्रात एंट्रीबाबत नकार दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात जाणार अशी चर्चा होती. मात्र अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या भाजपच्या कार्यकारणी बैठकीत आपण केंद्रात जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मुख्यमंत्र्यांचा केंद्रातील प्रवेशाबाबत खुलासा केलाय.
मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार नाहीत. केंद्रात काम करण्याची त्यांची क्षमता आहे. पण राज्याची जबाबदारी मोठी आहे.  आताच्या जबाबदाऱ्या खूप आहेत. नव्या मंत्रालयाची जबाबदारी पेलण्या वेळ नाही. सध्याच्या खात्यांचाच कार्यभार जास्त आहेत त्यामुळे ते केंद्रात येणार नाही त असं स्पष्टीकरण गडकरींनी  दिल.तसंच माझ्याकडे जे खातं आहे त्याचं काम मोठ आहे.  माझ्याकडे रेल्वे खातं येणार ही मीडियामध्ये चर्चा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.