पेट्रोलने भरलेला टँकर उलटला, मोठी दुर्घटना टळली !सचिन मुर्तडकर 

अकोला - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पातूर फाट्याजवळ पेट्रोलचा टँकर उलटल्याने खळबळ उडाली आहे. या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र पोलीस आनि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परीस्थिती आटोक्यात आणली..
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राट्रीय महामार्ग नंबर ६ वरिल पातूर नंदापुर फाटयावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पेट्रोल टँकर पलटी झाला. या अपघातात चालक वाहक यांना किरकोळ दुखापत झाली आहे. आज सकाळी १० च्या दरम्यान घडलेल्या mh 30 L1271 क्रमांकाच्या टँकर हा अमरावती कडे जात होता टँकर मधे मोठ्या प्रमाणात डिझल व पेट्रोल होते. घटनास्थळावर पेट्रोल डिझेलची गळती सुरूच आहे.. दरम्यान घटनास्थळावर मूर्तिजापुर ग्रामीण पोलिस, बोरगांव मंजू पोलिस सह अग्निशमन दल जेसीबी दाखल झाले आहेत. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करने सुरु आहे...