रामनाथ कोविंद यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

बातमी


मुंबई : राष्ट्रतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून श्री. कोविंद यांची देशाच्या सर्वोच्च पदावर होणारी ही निवड एका नव्या पर्वाचा प्रारंभ करणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात, श्री. कोविंद यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते या पदाला निश्चितच वेगळे परिमाण प्राप्त करून देतील.