तुळजाभवानी मंदीरात सोन्याची चोरी करणार्या महीलांना आटक

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडावर मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजना अंकुश ताटे (रा. रेणापूर, जि. लातूर) या मंगळवारी कुटुंबासह श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येथे आल्या होत्या. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास मंदिरातील होमकुंडासमोर दोन महिलांनी त्यांच्या गळ्यातील गंठण चोरण्याचा प्रयत्न केला. ही बाब तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. दीपावा लक्ष्मण जाधव  आणि उलगुबाई शिवाजी गायकवाड (दोघी रा. सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे असून, याप्रकरणी रंजना ताटे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.