
उस्मानाबाद : भूम तालुक्यातील आरसोली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची पाहणी केली. भूम येथील आरसोली येथे आरसोली देवळाली, तांबेवाडी या रस्त्याचे फीत कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा उस्मानाबादचे सहपालकमंत्री महादेव जानकर, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे तसेच महसूल व इतर विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी आरसोली गावचे सरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. |