उस्मानाबाद लिटील स्टार प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन

                  उस्मानाबाद ...    येथील पोलिस कल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत लिटील स्टार प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते दिपप्रवज्लन करुन या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. 
येथील लिटील स्टार प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनामध्ये शाळेतील विद्याथ्र्यांनी गोंधळ गीत, शेतकरी आत्महत्या जनजागृती नाटक, गोव्याचे लोकगीत, दशेभक्तीपर गीत तसेच विविध लोकगीतावर नृत्य सादर केले. तसेच या प्रसंगी शाळेच्या वतीने वर्षभरात घेण्यात आलेल्या शृत लेखन स्पर्धा, बडबड गीत, चित्रकला, श्लोक पाठांत्तर, इंग्रजी राईम्स, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, भाषण स्पर्धा, स्मरण स्पर्धा आदी स्पर्धेत विशेष प्राविण मिळविलेल्या विद्याथ्र्यांचा जिल्हा पोलिस अधिक्षक पवंâज देशमुख, डॉ. शिल्पा पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली घाटे - घाडगे, पोलिस उपाधिक्षक गोपिका जहागिरदार आदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देवून विद्याथ्र्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी या शाळेच्या कामगिरीचे कौतूक करुन गौरव केला. तसेच स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्याथ्र्यांचे कौतूक करुन ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत, अशा विद्याथ्र्यांनी नाराज न होता प्रयत्न करावेत असे आवाहन केले. हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिपक भांगे यांच्यासह ए. आर. कांबळे, आर. एस. झोरे, एन. व्ही. पांचाळ, आर. एस. शिवनीकर, एस. एस. रेगुडे, एस. एस. डोके, एम. एम. इंगळे, एस. एम. शेटे, ए. एस. गोरे, एस. एच. लोमटे, पी. सी. घोडके, आर. जी. पाटील, टी. बी. वाघमारे, जे. एस. चौधरी, उकिरडे, लांडगे, छाया गोरे आदिंनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचाल एस. एस. गोरे, एस. एस. रेगुडे तर आभार प्रदर्शन झोरे मॅडम यांनी मानले. या स्नेहसंमेलनासाठी शाळेचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.