चिमुकल्यांच्या सुप्त कलागुनांणा वावदेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे - प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचे प्रतिपादन


नांदेड रिपोर्टर..
चिमुकल्यामधे विविध प्रकारचे सुप्त कलागुन दडलेलेअसतात
त्यांच्या आवडी प्रमाणे आतील सुप्त कलागुनांणा वाव देण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे तसे झाल्यास तो चिमुकला आवडीच्या क्षेत्रानुसार नक्कीच मोठा होईल असे प्रतिपादन जि प
सदस्या प्रनिताताई देवरे चिखलिकर यांनी केले.लोह्यातील लिटल इंग्लिश स्कूल कला आविष्कार वार्षिक स्नेह संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी लावनी सम्राट भरत जेठवानी,संस्थेच्या संचालिका आश्विनी पेनुरकर,डॉ मंजूषा जवळगेकर,बाल कलाकार पूर्व वेजवाडे, शारदा ओझा,पालक जैन अदिची उपस्थिती होती.
पारंभी लिटल किंगच्या चिमुकल्यानी श्री गौरी गजानना या गीताने वार्षिक स्नेह संमेलन प्रारंभ केला.व चिमुकल्यानी हिंदी,मराठी,गाण्यावर नृत्य केले.उपस्तिथित मान्यवरानचे मने जिंकले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बालाजी पेनुरकर यांनी केले.तर सुत्रसंचलन पत्रकार विक्रम कदम यांनी केले.
यावेळी अनेक पालकांचि उपस्तिथी होती.