माहूरला चैत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल येणार
नांदेड.... आईनाथ सोनकांबळे
चैत्र नवरात्र महोत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा गुडीपाडव्यानिमीत्त श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र माहुर गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारपासून (दि.२८) प्रारंभ होणारा हा उत्सव ५ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
या कार्यक्रमात दोन एप्रिल रोजी प्रख्यात पार्श्‍वगायिका अनुराधा पौडवाल ह्या रेणुकामातेच्या चरणी संगीतसेवा अर्पण करणार आहेत. या उत्सवाला देश-विदेशातून लाखो भाविक शहरात दाखल झाले आहे, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश तथा रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आनंद यावलकर व सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.
चैत्र नवरात्र महोत्सवा निमित मंगळवारी दि. २८ मार्च रोजी गडावर घटस्थापना, ध्वजारोहण, गुडी पुजन, पुष्प पुजन, सकाळी सहा वाजेपासुन, स्वरभास्कर पंडित नितीन व पंडीत जयसिंग धुमाल या फिल्म व टिव्ही आर्टिशफेम कलाकरांच्या शनई वादनाच्या मंगलस्वरात संपन्न होणार आहे. दि.१ एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक पंडित संजय जोशी यांचे गित रामायण, सहकलाकार सौ.मानशी ऋषीकेष संतान यांच्या समवेत संपन्न होणार आहे. दि.२ एप्रिल रोजी संपूर्ण रेणुका भक्तांना बहारदार संगीताची मेजवानी मिळणार असून गाण कोकीळा पद्मश्री अनुराधा पौडवाल आपली संगीत सेवा सायंकाळी सात ते दहा वाजे पर्यंत रेणुका चरणी अर्पण करणार आहेत. दि.३ एप्रिलला सोमवारी महाकाली पुजन छबिणा व पानसे काकाच्या चैत्यन्य भजणी मंडळ अकोला यांच्या भजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि.४ एप्रिल पासून नवचंडी शतचंडी होम हवनाचा वेदोक्त कार्यक्रम वेधशाळेचे प्रधानाचार्य निलेश शास्त्री केदार व वेधशाळेतिल वेदोनारायनांच्या तालबद्ध मंत्रोच्चाराने होणार आहे. दि.५ एप्रिल रोजी पुर्णाहोती व नवरात्र समाप्ती होणार आहे. तरी महाप्रसादाचा लाभ दि २८ मार्च व ५ एप्रिल रोजी भाविक भक्तांनी आवश्य़क घ्यावा, असे आवाहन विश्‍वस्त चंद्रकात काका भोपी, संजय कान्नव, आशिष जोशी, विनायक भोपी, श्रीपाद भोपी, समीर भोपी, भवानीदास भोपी यांनी मह केले आहे.