देगलूरात गुटख्याच्या ३ गोण्या जप्त


नांदेड रिपोर्टर
पुडीमधील गुटख्याची निर्मिती व विक्री ?आणि सुगंधित तंबाखू यावर महाराष्ट्रामध्ये ?पूर्णपणो ?बंदी आहे; परंतु देगलूर शहरात पान टपर्‍यांवर व किरकोळ किराणा दुकानांत गुटख्याची सर्रास विक्री होते. यामुळे सिमावर्ती ?तेलंगाना राज्यामधून दररोज देगलूर शहरात गुटख्याची खाजगी वाहने,ऑटोरिक्षा,मोटारसायकल अथवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून आयात केली जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बिचकुंदा बसमधून देगलूरकडे येणारा तीन पोते गुटखा मदनूर पोलिसांनी पकडला. यामुळे देगलूरमध्ये खुटख्याची विक्री होते, यावर पुन्हा एकदा शिक्कामार्तब झाले.
शेजारील कर्नाटक व तेलंगणा राज्यातून देगलूरला गुटखा येतो, ही माहिती मिळाल्यावरुन मदनूर पोलिसांनी तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बिचकुंदा बसची तपासणी केली. या बसमध्ये शेख अहेमद(१७, रा.देगलूर) हा गुटख्याचे तीन पोते घेऊन देगलूरला येत होता. सदरील मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्याची कारवाई पोलीस उपनिरीखक बन्सीलाल व जमादार रामसिंग यांनी केली.
शेख अहेमद याच्या चौकशी दरम्यान तो देगलूरमध्ये पानटपर.य़ा व किरकोळ दुकानदारांना गुटखा पुरवठा करण्यारा व्यावसायिक असल्याचे सांगितले. हा दररोज बोधन येथून दररोज गुटखा आणून देतो, या बदल्यात त्यास व्यापार्‍यांकडून दररोज पैसे दिले जातात अशी माहिती ?पुढे आली आहे. त्यामुळे देगलूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये गुटखा पुरवठा करणारे कोण हे पुढे येणो गरजेचे आहे.