रिपोर्टर...महाराष्ट्र लाईव्ह.
वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसेच व्यक्तीच आयुष्य समृद्ध करत असतात, अवांतर वाचलेली पुस्तके व्यक्तिमत्वाच्या अंतर पटलावर परिणाम करत असतात यामुळे विद्यार्थी दशेत भरपूर वाचन केले पाहिजे असे मत अभयसिंह मोहिते उपविभागीय अधिकारी कळंब यांनी मतदार जनजागृती अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी दि.२ मार्च गुरुवारी शिक्षक भवन कळंब येथे केले.
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी ९ केंद्रातून विद्यार्थ्याच्य चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध, पथनाट्य आदी स्पर्धेचे लहान गट व मोठ्या गटातून आयोजन करण्यात आले होते. या केंद्रस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना शिक्षक भवन कळंब येथे बक्षिस स्वरुपात प्रशस्ती पत्र व पुस्तक देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री. अशोक नांदलगावकर तहसीलदार कळंब, श्री राहुल गायकवाड गटविकास अधिकारी कळंब, रविराज जाधव, राजीव बाबळे, एस डी टीपरसे नायब तहसीलदार कळंब,श्रीम यमुना देशमुख गटशिक्षणाधिकारी, बागल एस पी, तोडकर एम पी विस्तार अधिकारी (शी), महेश ढोले एस टी ओ कळंब, राजेंद्र बिक्क्ड का.चीटनिस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, एम जि शिंदे अ का तहसील कळंब, शंकर पाचाभाई तलाठी, खालील शेख यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना मोहिते पुढे म्हणाले कि, सध्या स्पर्धा परीक्षेच्या युगात विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकासोबतच वृत्तपत्राचेही वाचन नियमित केले पाहिजे. पालकांनी इंग्रजी भाषेचा जास्तीचा बाऊ न करता पाल्याची मातृभाषा समृद्ध करण्यावर भर द्यावा नंतरच्या कालावधीत इंग्रजीकडे लक्ष दिले गेले तरच सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मागे राहणार नाहीत. या प्रसंगी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या कामात निवडणूकनिर्णय अधिकारी कक्षात राजीव बाबळे, रविराज जाधव, वाहन व्यावस्थापन कक्षात टीपरसे, आचार सहित कक्षात गटविकास अधिकारी राहुल गायकवाड, बंडगर एम के, शेख रुबाब, व्ही व्ही टी कक्षात अंधारी वीरेश, खर्च कक्ष महेश ढोले, वळसे प्रदीप, टपाली मतपत्रिका रवींद्र भांडे, कर्मचारी नियुक्ती कक्ष एम जि शिंदे, व्यवस्थापन कक्षात खालील शेख, शंकर पाचाभाई, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष अनिल अहिरे, डी ए मोरे, संगणक कक्ष मुल्ला इरफान, त्रीशुलवार, एल के जाधवर, शिंदे उ सी, धुमाळे जे सी, गणेश कोठावळे, बाकले एन व्ही, अखिल कुलकर्णी, मतदार जनजागृती कक्षात पवार डी ओ, घुटे प्रशांत, साबळे आर पी, मोहिते एस एस, स्थिर पथक सूरवसे ए जे, चालक शौकत शेख यांना उल्लेखनीय कामाबद्दल उपविभागीय कार्यालयाच्या वतीने प्रशस्ती पत्र देउन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डी ओ पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीम यमुना देशमुख गटशिक्षणाधिकारी कळंब, संजीव बागल मधुकर तोडकर विस्तार अधिकारी (शी), डी ओ पवार, संतोष मोहिते, साबळे आर पी, प्रशांत घुटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.