संस्थापकासह समाजकल्यान अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळुन शिक्षकाने मागीतली स्वेच्छा मरणाची परवानगी...

रिपोर्टर...महाराष्ट्र लाईव्ह.

साने गुरूजी मतिमंद निवासी विदयालय येडशी येथिल शारिरीक शिक्षकाने समाज कल्यान अधिकारी,संस्थापकासह शाळेच्या मुख्याध्यपकाच्या त्रासाला कंटाळुन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागीतली आहे.बरेच दिवस झाले मला या संगळया लोंकानी कट रचुन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वारंवार होणा—या मानसीक तानाला कंटाळुन मी स्वेचा मरणाची परवानगी मागीतली आसल्याची माहीती या शिक्षकाने महाराष्ट्र लाईव्हला दिली. 

महात्मा जोतीबा फुले जिवन शिक्षण प्रसारक व अपंग सेवा मंडळ वलगुड संचलित साने गुरूजी मतिमंद निवासी विदयालय येडशी या शाळेत 2009 पासुन अरूण शिंदे हे शारिरीक शिक्षक या पदावर काम करतात.त्यांची सेवा निव्रत्ती होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र शाळा चालवण्यासाठी महीण्याला येणा—या  पगारितील पैसे देत नसल्यामुळे व शाळेत नसलेल्या सुविधा या विषयी आवाज उठवल्यामुळे कामावर रूजू झाल्यापासुन आजतागायत संस्थेचे अध्यक्ष मला वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी देतात. आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेतील काही महीला कर्मचारी यांनी वारंवार कट ​रचुन मला बदनाम करण्याचे ठरवले आहे.याची तक्रार समाज कल्यान अधिका—यांकडे केली आसता समाजकल्यान अधिकारी ही मला महीण्याला शाळा चालवण्यासाठी पगारीतील पैसे देण्यास सागतात. या मुळे समाजकल्यान अधिका—यासह संस्थपक, शाळेचे मुख्याध्यप आणि महीला कर्मचारी यांच्या कडुन माला धोका आसल्यामुळे याच्या संगळयाच्या त्रासााला कंटाळुन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या कडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागीतली आहे. असे महाराष्ट्र लाईव्ह ला  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.