रिपोर्ट...उस्मानाबाद जिल्हापरिषदेमध्ये या वेळी तरूण सदस्य मोठया संख्येने दाखल झाले आहेत.परंतू त्याच्या कडुन जनतेच्या आपेक्षाही तस्याच वाढलेल्या आहेत.या निवडुन आलेल्या तरूण मंडळीणी कुरघोडीच राजकारण न करता विकासाच राजकारण करून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याच्या आपेक्षा उस्मानाबाद जिल्हयातील जनतेच्या आहेत.
           जिल्ह्यातील ५५ सदस्यांमध्ये यंदाच्या निवडणुकीत तरुणवर्गाला मोठ्या प्रमाणात तरूण वर्गाला संधी मीळाली आहे.. यामध्ये बहुतांश तरुण कार्यकर्त्यांना विजय मीळाला आहे. आमदार बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील यांना आलूरमधून संधी मिळाली. पहिल्यांदाच त्यांची जिल्हा परिषदेमध्ये एंट्री होत आहे तर भाजपचे कैलास शिंदे यांचे चिरंजीव दिग्विजय शिंदे यांनीही गुंजोटी गटातून विजय मिळविला आहे. तरुणाईला संधी देण्याचे सर्वच पक्षांकडून आश्‍वासन दिले जाते. परंतु प्रत्यक्षात अनुभव हा निकष लावत उमेदवारी देण्याचा प्रयत्न होतो.
 राजकीय वारसा पुढे सुरू ठेवण्याच्या हेतूने तसेच घरातील वरिष्ठांकडून मिळालेल्या प्रेरणेतून राजकीय आखाड्यात उड्या मारल्या जातात. सांजा गटातून कैलास पाटील यांनी बाजी मारली आहे. गेल्या पाच वर्षात सारोळा व परिसरात . पाटील यांनी मोठ्या प्रमाणात जलसंधारणासह शेतीची कामे केली आहेत. दुष्काळातही एक आदर्श गाव म्हणून राज्यात सारोळ्याची ओळख निर्माण केली आहे. तेही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत जात आहेत. 

भाजपचे अभय चालुक्‍यांनीही तुरोरी गटातून बाजी मारली आहे. या तरुण सदस्यांच्या डोईवर जनतेच्या अपेक्षांचे ओझे असणार आहे. घरात राजकीय पार्श्वभूमी असल्याने वरिष्ठांच्या अनुभवाचा जनतेच्या हितासाठी फायदा होणार आहे.त्यामुळे . जनताही तरुण सदस्यांकडे अपेक्षेने पाहत असून ही फौज कसे कामकाज करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.