नोटाला मतदान करणाराचं म्हणनं काय?


Image result for voting machine


मतदान कारणं हा मानसाला लोकशाहीने दिलेला महत्वपुर्ण अधिकार आहे.मतदान करायच किंवा नाही करायच हेही मानुसच ठरवतो आणि केल तर कोनाला करायच हे ही आपनच ठरवतो परंतु जेव्हा नोटाला मतदान करायच मतदार ठरवतो तेव्हा मात्र काही तरी कारण नक्कीच आसते. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हापरिषद पंचायत समीती निवडनुकाचा निकाल लागला. उस्मानाबाद जिल्हयामध्ये जवळपास हाती आलेल्या माहीती नुसार 2155 मतदाराने नोटाला मतदान करण्याची पसंती दर्शिवीली. नोटाला मतदान करणे म्हणजे लोकशाहीच्या राष्ट्रात निवडनुक घटकावर  आलेल संकटचं म्हणावे लागेल. नोटाला मतदान करण्याचे  दुसरे कारण म्हणजे राजकारणाची खालावत चाललेली पातळी आणि आपल्याला मतदान करण्यासाठी लायक नसलेले उमेदवार. लोकशाही स्थिर ठेवण्यासाठी निवडुक प्रक्रिया ही अतिशय महत्वाची मानली जाते.परंतु लोकशाही पध्दतीनेच पार पडलेल्या निवडनुकीत जर मतदारांची घुसमट होत आसेल तर दोष कुनाचा? नालायक उमेदवाराचा की पातळी सोडलेल्या राजकारणाचा. या संगळया गोष्टीचा विचार करता प्रतेक निवडनुकीला वाढत चाललेला नोटा मतदारांचा टक्का हा संगळयानाच आत्मचितंन करायला लाचणारा विषय आहे.त्यामुळे यापेक्षा जास्त नोटा मतदार वाढवण्याच्या आधी मतदाराच्या मनातील राजकारणा विषयी आसेलेल्या तिरस्कारच निवारण करण गरजेच आहे.आणि ती लोकशाहीची गरज आहे.

श्रीराम क्षीरसागर
जिल्हा प्रतिनिधी
न्युज नेशन