जिल्हाध्यक्ष बदली आणि सावंत यांचा ओहर आत्मविश्वास शिवसेनेला नडला...

.

उस्मानाबाद जिल्हयामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिपपस निवडनुकीमध्ये शिवसेनेला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे.त्याचे कारण म्हणजे काही दिवसापुर्वी जिल्हा शिवसेनेत झालेले फेरबदल आणि शिवसेनेचे उपनेते सावंत यांची घमंडी भाषाशैली आसेच म्हणावे लागेल.उस्मानाबाद जिल्हयामध्ये पुर्विपासुनच शिवसेना पक्षाला मतदाराने चांगली साथ दिलेली आहे.परंतू त्यांच्याच आंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेला आपयशाचे आनुभव येवूनही उस्मानाबाद मधील शिवसेना पदाधिका—यांनी त्याची कसलीही दखल घेतली नाही. त्याचाच प्रतेय म्हणूण पार पडलेल्या निवडनुकीमध्ये शिवसेनाला आपयशाला सामोरे जावे लागले आहे. निवडनुकी पुर्वी जिल्हा शिवसेनेत झालेल्या फेरबदलामुळे शिवसेनेला जिपच्या दोन ते तिन जागा गमवाव्या लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गेल्या वेळी उस्मानाबाद जिल्हापरिषदेवर शिवसेना आणि कॉग्रेस या दोन पक्षाची सत्ता होती आता म़ात्र शिवसेनेच्या जागा कमी आसल्याने शिवसेनेला सत्तेपासुन दुर रहावे लागणार आहे.तसेच पंचायत समीतीलाही भुम,परंडा,कळंब या ठीकाणी राष्ट्रवादी कॉग्रेस ची सत्ता आहे तर उमरगा,लोहारा,तुळजापुर येथे कॉग्रेस च्या हाती सत्ता आहे.एवडेच नाही तर उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार रवि गायकवाड यांच्या मुलाचा झालेला पराभव हा खासदाराची जिल्हयाच्या राजकारणांवर आसलेली कंमाड दर्शिवणाराच म्हणावा लागेल? ही संगळी परिस्थिती पहाता जिल्हयामध्ये शिवसेनेला सत्तेपासुन दुर रहाण्याची वेळ आजी माजी पदाधीकारी यांच्या गटबाजी आणि निष्क्रीयतेमुच आली आसल्याचे चित्र दिसत आहे

माजी आमदार ओमराजे यांची प्रतिक्रीया

शेवटी शिवसेना पक्ष मोठा आहे.त्यात कोनताच पदाधिकारी मोठा नाही आमच्या  काही जागा आगदी थोडया मतानी गेल्या आहेत.त्यामुळे मला वाटत नाही की जिल्हाध्यक्ष बदलीमुळे शिवसेनेला काही आपयश आले आहे.

संपादक
महाराष्ट्र लाईव्ह