उस्मानाबाद जिल्हापरिषदेवर 55 पैकी 26 जागा राष्ट्रवादीच्या..


.


उस्मानाबाद जिल्हापरिषदेच्या लागलेल्या निकालात राष्ट्रवादी पक्षाने भरभरून यश मिळवले आसुन 55 जागापैकी 26 जागा जिंकण्याचा पराक्रम राष्ट्रवादीने केला आहे.एक हाती सत्ता येण्यासाठी आगदी दोन जागा कमी पडल्या आसल्या तरी आलेल्या 26 जागेमुळे उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादी पक्षाचाच जोर आसल्याचे दिसुन आले.
उस्मानाबाद जिल्हापरिषेदेच्या निवडनुकीचा निकाल आज 23 फेब्रुवारी रोजी पार पडला त्यामध्ये जिल्हापरिषदेच्या 55 जागापैकी राष्ट्रवादी 26,कॉग्रेस 13, शिवसेना 11 भाजप 4,तर आपक्ष 1, आशा प्रकारच्या जागा निवडुन आल्या. मागील पांचिकवर्षामध्ये जिल्हापरिषदेवर कॉग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. परंतु या वेळी मात्र चित्र बदललेल दिसत आसुन राष्ट्रवादी पक्षाची सत्ता उस्मानाबाद जिल्हापरिषदेवर येवू शकते आसे चित्र निर्माण झाले आहे.