उस्मानाबाद तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर दुकान दारांची हुकूमशाही तर आधिकार्याची हाप्ते बाजी चालू

                      संपादक
                 श्रीराम क्षीरसागर


उस्मानाबाद शहरासह तालुक्यात स्वस्त धान्य दुकान दारांकडे पुरवठा विभागातील आधिकार्याचे आक्षम्य दुर्लक्ष आसल्याने तालुक्यातील कुठल्याच दुकानदारांना आधिकार्याचा धाक राहीला नाही. त्यामुळे या व्यवस्थेला हुकूमशहाचे स्वरूप आले आहे.तालुक्यातील ब—याच दुकानामध्ये माल कधी उचलला जातो,कधी वाटप केला जातो आणि काळया बाजारात कीती विकला जातो.याकडे कुनाचेही लक्ष आसल्याचे दिसत नाही पुरवठा विभागातील आधिकारी हाप्ते घेत आसल्याची माहीती काही दुकान दारांनी कॅमे—यासमोर दिल्याने हा संगळा प्रकार उघकीस आला आ​हे.प्रतेक महीण्याला चलन भरताना पुरवठा आधिका—याला आणि माल भरताना गोडवान किपरला हाप्त्याच्या स्वरूपात पैसे दिले जातात आशी माहीती तालुक्यातील काही दुकान दारांनी दिली आहे.धान्यांच्या प्रतेक 50 कीलोच्या पोत्यामाध्ये 2 ते आडीच कीलो माल का कमी येतो यांच उत्तर पुरवठा विभागाकडे मीळत नाही.100 कीलोच्या पोत्यामध्ये 4 कीलो माल कमी येवुन सुध्दा आधिका—यांना दुकानदारांकडुन हाप्ते कशासाठी मीळतात हे विशेष आहे.शहरातील काही दुकानदार तर एकच दिवशी माल वाटप करून दुकान बंद करतात आणि लाभधारक दुकानाला फे—या मारताना दिसतात. यामुळे दुकानदांराची हुकूमशाही बंद करून आधिका—यांच्या हाप्तेबाजीवर लगाम घालने गरजेचे आहे.