विजयी नगरसेवकांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वतीने सत्कार

- नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणूकीत विजयी झालेले शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह सर्व विजयी नगरसेवकांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पराभूत झालेल्या परंतू शिवसेनेच्या वतीने नगरसेवकपदाची निवडणूक लढविणाNया उमेदवारांचाही सत्कार करण्यात आला. 
येथील श्रीपतराव भोसले हायस्वूâलच्या प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस गुरुवर्य के. टी. पाटील सर, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, शिवसेनेचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नुतन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा युवा अधिकारी तथा नुतन नगरसेवक सुरज साळुंके, तालुकाप्रमुख दिलीप जावळे, शहरप्रमुख पप्पू मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मॉसाहेब यांच्या प्रतिमाचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस गुरुवर्य के. टी. पाटील सर यांचा सत्कार करुन आर्शिवाद घेतले. यानंतर जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या वतीने नुतन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह नुतन नगरसेवक सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे, सिध्देवर कोळी, राणा बनसोडे, गणेश अचलेकर, राजाभाऊ पवार, प्रेमा पाटील, तुषार निंबाळकर याचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शिवसेनेच्या वतीने नगरसेवकपदाची निवडणूक लढविणाNया पण पराभूत झालेल्या उमेदवारांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नुतन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा युवा अधिकारी तथा नुतन नगरसेवक सुरज साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास विद्यार्थीसेना जिल्हा संघटक श्रीकांत देशमुख, जि.प. सदस्या सुषमा देशमुख, प्रशासकीय अधिकारी शिवानंद पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, प्रदीप साळुंके, खालेद शेख, विनोद निंबाळकर, दिपक जाधव, बालाजी पवार, लिंबराज डुकरे, ओम जाधव यांच्यासह आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.