डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यातील खासदारांचे अभिवादन


नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातील खासदारांनी महाराष्ट्र सदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज सकाळी लातुरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड, राज्यसभेचे खासदार सर्वश्री अमर साबळे, डॉ. विकास महात्मे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठी बांधवांनीही डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.