निवडनुक आयोग जी शिक्षा देईल ती भेगायला तयार ... सुभास देशमुख..

maharashtra_subhash-deshmukh रिपोर्टर ....  लोकमंगल प्रकरणी अखेर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अनियमियता झाल्याचं मान्य केलंय. निवडणूक आयोग जी काही शिक्षा देईल ती भोगण्यास तयार आहे असंही देशमुख यांनी कबूल केलं. मात्र. यात कोणताही गैरव्यवहार झाला नाही असा दावाही देशमुख यांनी केला.
लोकमंगल कॅश प्रकरणात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख पुरते अडचणीत सापडले आहे. उमरग्यात निवडणूक आयोगाने एका कारमध्ये 91 लाखांच्या कॅश पकडली होती. ही 91 लाखांची रक्कम 5 तारखेलाच उमरगा, आणि लोहारा शाखेतून सोलापूरच्या शाखेत भरण्यासाठी निघाल्याचा दावा लोकमंगल समुहाने केल्यानं संशयाला मोठी जागा निर्माण झालीय. कारण याच कालावधीत म्हणजेच 8 तारखेलाच नोटाबंदीचाही निर्णय जाहीर झाला होता.
विशेष म्हणजे या सर्व नोटा हजार-पाचशेच्या होत्या. म्हणूनच नगरपरिषदेची निवडणूक लागलेल्या उमरग्यात लोकमंगलची ही गाडी एवढी मोठी कॅश नेमकी कशासाठी घेऊन फिरत होती. असा सवाल निवडणूक आयोगाने उपस्थित केलाय. त्यावर हे सर्व पैसे लोकमंगल मल्टीस्टेट बँकेचेच असून बँकेत भरणा करण्यासाठी जात असल्याचा दावा लोकमंगलने केलाय तसंच पैशांसंबंधीच्या अनियमितेबद्दल आयोग देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असं लोकमंगल समुहाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलंय