लोकमंगल समुहाला निवडनुक आयोगाची नोटीस


रिपोर्टर..

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची जवळपास एक कोटीची रक्कम काल नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. उस्मानाबादच्या उमरगा इथं ही कारवाई केली. नगर पालिका गस्ती पथकानं 91 लाख 50 हजार रुपयांची रक्कम पकडली.
टाटा सुमो जीपमधून ही रोकड जप्त केली. जुन्या एक हजार नोटांच्या रूपात ही रक्कम होती.
जीपवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाचं नाव होतं. ही रक्कम लोकमंगल बँकेची असल्याची प्राथमिक माहिती होती..यामुळे निवडनुक आयोगाने लोकमंगल समुहाला घडलेल्या प्रकाराचे दोन दिवसात स्पष्टीकरण दया आशी नोटीस पाटवली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सहकारमंत्र्यांच्या उद्योगसमूहाच्या गाडीतल्या 91 लाखा विषयी कोणतीही कागदपत्र नाहीत.