तूळजापुरला काम नसताना मंत्रयांची गर्दीतुळजापुर ला आलिकडच्या काळात मंत्रयांची गर्दी चागलीच वाढत चालली आहे.या बिनाकामच्या गर्दीमुळे जिल्हयातील शासकिय यंत्रना दररेाजचे काम सोडून मंत्रयांच्या नियोजनामध्ये आडकुन पडत आहे.त्याच बरोबर पुर्वीपासुन चालत आलेल्या मंदीर संस्थानच्या परंपराही मोडल्या जात आहेत.

उस्मानाबाद जिल्यातील तुळजापुर हे महाराष्ट्रासह देशाचे श्रध्दास्थान आसल्यामुळे वर्षातील प्रतेक दिवशी तिथे भक्तांची गर्दी आसते.  दिवसेंदिवस वाढत आसलेल्या गर्दीमुळे मंदीर संस्थानलाही त्यांचे नियोजन करता येत नाही. आशा परिस्थितीमध्येच हौसी मंत्री आपले काही काम नसतानाही जिल्हयातील संगळी शासकीय यंत्रना कामाला लावून फक्त देविच्या दर्शनासाठी उस्मानाबाद जिल्हयाचा दौरा काडतात.दोन दिवसापुर्वी राज्याचे आर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार आले आसता तब्बल सध्याकाळी 11 वजेपर्यत मंदीर चालु ठेवत मंदीर संस्थान आणि पुजारी मंडळ थांबल होत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भाविकांला भवानीमातेच्या पायावर डोक ठेवताना दोन सेकंद उशिर झाला तर मानसांना धरून ढकलनारे पुजारी आणि मंदीर संस्थान काम नसताना आलेलया मंत्रयाची तब्बल चार ते पाच तास वाट पहात बसतं ही कुठली परंपरा आहे आणि याच कारण काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.मंत्रयांच्या दौ—यासाठी मंदीराच्या पुर्विपासुन चालत आलेल्या परंपरा मोडल्या जात आहेत हे कशासाठी आशी चर्चा सर्वसामान्यातून होत आहे.