पालक सचिव महेश पाठक यांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न.....
उस्मानाबाद : एकाच दिवशी राज्यात किमान दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा कारागृह परिसरात जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रारंभी जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांच्या हस्ते वृक्षाचे विधीवत पूजन व वृक्षारोपण करुन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रूपाली सातपुते. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक ए. एस. निकत, वन अधिकारी आर. ए. सातोलीकर तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि पत्रकारांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्ष लागवड कार्यक्रमास वनीकरण विभागातील तसेच जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.