इंग्लीश स्कुलच्या पहील्या वर्गाच्या पुस्तकामध्ये भारताच्या प्रतिज्ञेला स्थान नाही.



इंग्रजी भाषा ही देशा बाहेरील आसली तरी तीला आपल्या देशामध्ये महत्याचे स्थान दिले जाते त्यामुळे शिक्षणाच्या पध्दतीही बदलत चालल्याचे दिसते त्याच बरोबर देशाच्या मान सन्मानांला आपमानीत करून पाश्चिमात्या संस्कृतीचा वारसा जपल्या प्रमाणे काही गोष्टी घडताना दिसतात.इंग्लीश स्कुलच्या पुस्तका मधुन भारताची प्रतिज्ञा नाहीशी करणे ही कुठल्या शैक्षणीक नियमात बसते व कशाचा आधार घेवुन ही प्रतिज्ञा काढुन टाकण्यात आली .
आणि आशा पब्लिकेशनवर काय कारवाई होणार?
इंग्रजी शिक्षणाच जाळं देशामध्ये जोरात पसरताना दिसत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत.याचा अर्थ आपन इंग्रजी भाषेचा आधर करतो परंतु आपन ज्या प्रमाने प​रकीय भाषेचा आधर करतो त्याच प्रमाणे आपल्या देशाच्या मान सन्मानाला जपन ही आपले कर्तव्य आहे. इंग्रजी शिक्षण घेन जस महत्वाच आहे तसच आपल्या देशाच्या संस्कृतीचा आदर करण ही महत्वाच आाहे.आज आपल्याकडे जास्त टॉन्डरनेस दाखवण्याच्या शर्यती लागल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टीकड या लोकांच लक्ष नसल्याच दिसत आहे.आपल्याच देशात शिकवल्या जाणा—या आभ्यास क्रमामध्ये आपल्या देशाची प्रतिज्ञा नाही याच्या सारखी शरमेची बाब कोनती नाही आसच म्हणाव लागेल. दिवसेंदिवस होत चाललेला पाश्चिमात्या संस्कृतीचा बाजार आपल्या लोकशाहीच्या देशाला धोका ठरू शकतो त्यामुळे आशा लोकांना वेळीच आवर घालन गरजेच आहे.