. परंडा तालुक्यातील सतरा चारा छावण्या बंद..

रिपोर्टर.. : तालुक्यात मागील आठवड्यात मान्सूनपुर्व पावसास सुरूवात झाले आहे. त्यामुळे खरीपपेरणी पुर्ण मशागतीसाठी व पेरणीसाठी चारा छावणीतील जनावरे शेतकरी आपल्या शेतात घेवनू जात आहेत. परिणामी चारा छावणी सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या जनावरांची संख्या शिल्लक राहत नसल्यामुळे तालुक्यतील २१ पैकी तब्बल १७ छावण्या बंद झाल्या आहेत. तसा तालुका प्रशासनाकडे ७ जून २०१६ रोजी अहवालही प्राप्त झाला आहे. सध्या ४ छावण्या चालू राहिल्या असून २८२८ मोठी तर २३० अशी एकूण ३०५८ जनावरे चारा छावणीत राहिली आहेत. 

तालुक्यात मागील तीन वर्षापासून होत असलेल्या अल्प पावसामुळे यावर्षी भिषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतक-यांसमोर जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनला होता. ६ जून २०१६ पर्यंत चालू होत्या. त्यामुळे २० हजारापर्यंतच्या लहान मोठ्या जनावरांना आधार मिळाला होता. मात्र मागील आठवड्यात पुर्व हंगामी पावसाने हजेरी तालुक्यात लावल्यामुळे खरिप पेरणी व खरीप पुर्व मशागतीसाठी या चारा छावणीतील बैल जोडीसह इतर जनावरे शेतकरी आपल्या गावकडे घेवून जाताना दिसत आहेत. त्यामुळे छावण्यातील जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे १७ चारा छावण्या बंद झाल्या आहेत. 

सध्या तालुक्यात ४ चारा छावण्या सुरू असून कै. वसंतराव पाटील चारा छावणी भोत्रा लहान ५८ तर मोठी १०९२, शिवतेज चारा छावणी आसू ऐनापूरवाडी लहान ३२ तर मोठी ६६५, शिवशक्ती चारा छावणी देवगाव (बू) लहान ९० तर मोठी ५६१, दिपशोभा चारा छावणी पाढरेवाडी लहान ५० तर मोठी ५१० अशी चार छावण्यामध्ये मोठी मिळून ३०५८ जनावरे राहिली आहेत. 

परंतू मागील दोन महिन्यापुर्वीच तालुक्यातील चारा संपल्याने चारा उपलब्ध करणे छावणी चालकांना कठीण झाले होते. तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावणी चालकांना सुरूवातीच्या काळात चारा मिळाला मात्र तो मागील दोन महिन्यापुर्वीच संपल्याने तो कोठून उपलब्ध करावा असा मोठा प्रश्न पडला होता. त्यामुळे चारा छावणी बंद होण्याची वाट छावणी चालक बघत होते.

9