राष्ट्रवादीचे नगरसेवक आवेद धंदे करतात.. . विश्वास शिंदे याचा आरोपरिपोर्टर...उस्मानाबाद शहरामध्ये राष्ट्रवादीचे नगर सेवक आवेद धंदे करत असुन शहराचा कुठलाच विकास न करता दारू विक्री करणे ,मटका चालवने ,गुत्तेदारी करणे आसे व्यावसाय करत आहेत.यामुळेच उस्मानाबाद शहराचे वाटोळे झाले आहे त्याला जबाबदार सर्वस्वी राष्ट्रवादीच आल्याने आम्ही कॉग्रेसच्या वतीने ​नगरपालीकच्या गैरकारभारा विरूध्द मोर्चा काढत असल्याची माहीती विश्वास शिंदे यांनी दि.19 जुन रोजी पत्रकार परिषेदेमध्ये दिली. यावेळी नगरसेवक खलील सर, नादेउल्ला हुसेनी,यांच्या सह राजाभउ शेरखाने, डॉ स्मीता शहापुरकर ,बाळासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती.

    उस्मानाबाद नगरपालीकेच्या गलथान व बेजबाबदार कारभरामुळे उस्मानाबाद शहरवाशियांना मुलभुत सुविधा मीळणे कठीन झाले आहे.नळपटटी, कचरापटटी, आशा प्रकारचे संगळे कर घेवुन सुध्दा नागरिकांना सुविधा पासुन वंचित रहावे लागत आहे.याला जबाबदार उस्मानाबाद राष्ट्रवादीच असुन शहर वाशियांच्या मुलभुत मागण्या पुर्ण करण्यासाठी मोर्चात मोठया संख्यांनी सहभागी होण्याचे अवहान विश्वास शिंदे यांनी केले आहे.