मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता


CM Deven
 मुंबई..--एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दहा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे पत्ते आपल्याकडे राखून ठेवले आहेत.
मुख्यमंत्र्यांना एकून 13 मंत्री पदे भरायची आहेत. यापैकी 2 शिवसेना आणि 11 भाजपाकडे असतील, तर 11 जागांपैकी 3 जागा मित्र पक्षाला जातील. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी देऊन, मुख्यमंत्री धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, खडसेंच्या राजीनाम्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपाची आज कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संघटनमंत्री व्ही सतीश सहभागी होणार आहेत. या बैठकीला एकनाथ खडसेही हजर राहण्याची शक्यता आहे.