
काल उस्मानाबाद पोलिस दलाच्या अपर पोलिस अधीक्षक दिपाली घाडगे यांनी धाडसी कारवाई करीत तुळजापुर येथील पावन रेसॉर्ट मध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून मूली पुरावल्याच्या आरोपाखाली दीपा संतोष वाघमारे व शशिकांत व्हनाळे या २ संशयित आरोपींना अटक केली होती त्यांना आज कोर्टात हजर केले असता त्यांना सोमवार २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .
तुळजापुर येथे उघड झालेल्या या सेक्स रॅकेट व्याप्ती वाढणार असून अनेक लोकांचा यामधील सहभाग उघड होण्याची शक्यता आहे. पोलीसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपीक‹डे वेश्याव्यवसाय करणा-या अनेक मुलींचे फ़ोटो व ग्राहक यांचे नंबर सापडले आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करीत असून ज्या व्यक्तींचे नंबर आरोपीकडे सापडले आहेत त्या ग्राहकांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश असून पोलिस तपासाची चक्रे त्यानुसार सुरु असून त्यांची नावे तपासात लवकरच उघड होणार आहेत. एकुण या प्रकारामुळे अनेकांची झोप उडाली असुन काल छापा मारून आरोपींना अटक केल्यानंतर तुळजापुर शहरात एकच खळबळ उडाली होती.
आज पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीच्या मोबाईलमध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त मुलींचे फ़ोटो सापडले असून त्यात मुंबईसह इतर भागातील मुलींचा समावेश आहे. यातील दलाल हे पश्चिम बंगाल येथून मुली आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा आता खोलात जावुन तपास करीत आहेत.
दरम्यान पावन रेसॉर्टचे नितीन पाटील हे जिल्ह्यातील बड्या राजकारणी लोकांचे नातलग आहेत. त्यामुळे सदरील प्रकरण दडपण्यासाठी पोलीसांवर मोठा दबाव येत असल्याची चर्चा परिसरात होती. मात्र सद्य:स्थितीला पोलीसांनी केलेल्या कारवाईनंतर तुळजापुरसह जिल्ह्यातील अनेक आंबटशौकीन ग्राहक, राजकीय पदाधिकारी व व्यापा-यांची नावे उघड होणार आहेत . पावन रेसॉर्टचे नितीन पाटील यांच्यावर पीटा कायदा 3, 4,5 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून ते अद्याप फरार आहेत. पोलीसांच्या या कारवाई मुळे मोठी खळबळ उडाली आहे.