इंगलीश स्कुल चालकाकडुन पालकाची दिशाभुल..


रिपोर्टर.. आरटीई 2009 कायदयानुसार इंग्लीश स्कुल ला देण्यात आलेले निकश न पाळल्यामुळे पालकांची दिशाभुल होवून त्यांना शासनाने दिलेल्या सवलती पासुन वंचीत राहावे लागत आहे.  उस्मानाबाद मध्ये काही शांळानी आपल्या मान्यतेच्या प्रस्तावामध्ये शाळेचे ठिकान चुकीचे दाखवल्याने आर्थिक द्रष्टया दुर्बल घटकांसाठी ते नुकसानीचे ठरत आहे.  ‘आरटीई’ कायद्यानुसार शाळेतील 25 टक्के प्रवेश मोफत देण्याची प्रक्रिया यंदा ऑनलाईन राबविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना ढोकी  येथील विमल देशमुख इंग्लिश स्कूल’ चे लोकेशन पुणे शहरातील दाखविण्यात आल्याने पालकांना अर्ज दाखल करता आलेला नाही. याचुकीमुळे या शाळेतील 20 जागा रिक्त राहिल्या आहेत. 
बालकांचा शिक्षणाचा मोफत अधिकार कायद्यानुसार इंग्रजी व मराठी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळेत 25 टक्के जागा मोफत भरल्या जातात. मागासवर्गीय वंचित घटकातील व अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना 25 टक्के जागेवर मोफत प्रवेश देण्याची कायद्यात तरतुद आहे. दरवर्षी मोफत प्रवेशाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आणि शाळा स्तरावर राबविली जात होती. यंदा ही प्रवेश ऑनलाईन राबविण्यात आली आहे. पालकांचे एक लाखाच्या आतील तहसीलदारांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पालकांचे जातीचे प्रमाणपत्र, पाल्यांचे जन्माचे प्रमाणपत्र एक फोटो प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज दाखल करताना आवश्यक होती. मे महिन्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली होती.