परंडा येथे जलपुजनाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी घेतली सभारिपोर्टर.. उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यात शिवजल क्रांती योजनेअर्तगत झालेल्या कामामुळे तालुक्यातील शेतक—यांना मोठा फायदा झाला असुन दि.18 जुन रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रत्यक्षात येवुन या कामाची पहाणी केली व साटलेल्या पाण्याचे जलपुजण केले. परंडा तालुक्यात शिवसेने चे नेते तानाजी सावंत यांनी काही दिवसा पुर्वी शिवजल क्रांती योजना राबवुन बरीच कामे केली होती. त्या कामामुळे शेतक—यांना फायदा होणार हे निश्चीत होते. सुदैव असे की माघील सहा ते सात वर्षे दुष्काळी यातना भोगणारा परंडा तालुका पण् या वर्षी मान्सुनपुर्व पावसाने हाजेरी लावून शिवजल क्रांती योजनेची हरीत क्रांती केली. आणि शेतक—यांचा पाण्याचा प्रश्न मिटवला. या झालेल्या कामामुळे आमाप पाण्याचा साठा झाला. आणि ही योजना कामी आली. दि. 18 जुन रोजी उध्दव ठाकरे यांच्या हास्ते या पाण्याचे जलपुजन करण्यात आले. हा जल पुजनाचा कार्यक्रम झाल्या नंतर परंडा येथे उध्दव ठाकरे यांनी सभा घेतली.