सोनारी मध्ये माकडाचे बे हाल ट्रस्टीचा चा हालगर्जीपणा..


श्रीराम क्षीरसागर
संपादक महाराष्ट्र लाईव्ह

सोनारी येथिल 5 हजार माकडं भेागत आहेत मरण यातना महाराष्ट्राला परिचीत असलेल आणि 75 टक्के लोकांच कुलदैवत असलेल भैरवनाथ हे तिर्थक्षेत्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि ट्रस्टी च्या हालगर्जीपणामुळे सोईसुविधा पासुन वंचीत आहे. ना मानसाची सोय ना माकडाची सोय आशा कारणामुळे 700 एकर चे मालक असुनसुध्दा माकडं राहतात आन्न पाण्याविना.

उस्मानाबाद जिल्हयाच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथिल भैरवनाथ हे नावलोकीक तिर्थक्षेत्र आहे.तसेच ते माकडासाठी ही प्रसिध्द आहे.परंतु देवरूपी माकडाचे खाण्या—पिण्यासाठी जे हाल होतात ते पहाण्यासारखे नाहीत. देवाबरोबरच माकडांना ही या ठीकानी 700 एकर जमीन असुन सुध्दा लोकाच्या हातातील हिसकावुन खाण्या शिवाय त्यांच्या कडे पर्याय नाही. महत्वाचे म्हणजे विधानसभेच्या 60 ते 70 सदस्याचे हे देवस्थान कुलदैवत आहे.तरी पण येथे ना मानसाची सोय ना माकडाची सोय या गावाची लोकसंख्या भी आणि माकडाची संख्या भी 5 हजाराच्या जवळ पासच आहे. या ठीकानी दर वर्षाला यात्रा भरते या यात्रेमधुन ट्रस्टीला लाखो रूपयाचे उत्पन्न आहे.परंतु या ठीकानी भक्तासाठी साधी बातरूमची सुध्दा सोय नाही.या ठिकानचा इतिहास आस सांगतो की ज्यावेळी 1881 ला या गावामध्ये भगवान भैरवनाथ आले आणि त्याच वेळी त्यांचे सैन्य म्हणुन ही माकड सैना या ठीकानी आली. देवासाठी असलेली 700 एकर जमीन ही माकडयाच्या पण हिस्याची आहे.असे सांगीतले जाते.परंतु या माकडावर आज आशी वेळ आहे की त्यांना पिण्यासाठी पाणी नाही खाण्यासाठी आन्न नाही या कारनाने काही वेळा माकडाचा मृत्यू सुध्दा या ठिकाणी झाला आहे. मागील दोन चार वर्षामध्ये या ठीकाणी बारवातील दुषित पाणी पिल्याने जवळ—जवळ 200 ते 250 माकडं मरण पावली होती. तरीही माकडाच्या खाण्या पिण्याची काळजी ना ट्रस्टी ने घेतली ना वनविभागाने घेतली. 700 एकरचे मालक असुन उपाशी मरण्याची वेळ या माकडावर आली आहे. तरी याकडे सरकारने गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे येथिल ग्रामस्तानी महाराष्ट्र लाईव्ह सि बोलताना सांगितले.