हॉटेल मयुर पॅलेश वर पोलीसांची धाड, पाच आटकेत

 रिपोर्टर..उस्मानाबाद शहरानजीकच्या आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील मयुर पॅलेसमध्ये काही इसम बाहेरील महिलांना आणून त्यांना वेश्या व्यवसायास भाग पाडत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून अतिरिक्त पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, शहर ठाण्याचे पोनि डी.एम.शेख, सपोनि एम.एस. सानप यांच्यासह मपोहेकॉ माया दामोदरे, पठाण, बालाजी कामतकर आदींनी शनिवारी पहाटेच्या सुमारास मयुर पॅलेसवर अचानक धाड मारली. त्यावेळी आतमध्ये पाच इसमांसह दोन महिला पोलिसांना आढळून आल्या. 
पोलिसांनी त्या दोन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर एक जीप, ३१ हजार रूपयांचे चार मोबाईल व रोख ५१ हजार ४५0 रूपये जप्त केले. या प्रकरणी पोना दीपक नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयुर पॅलेसचा व्यवस्थापक मुकुंद केरबा गरड रा. कौडगाव ह.मु.उस्मानाबाद, चंद्रशेखर भगवान गायकवाड रा. मंगळवेढा, रविंद्र पोपट शिंदे (रा. मोडनिंब), सचिन बालाजी जाधव [रा. कारखाना रोड, मंगळवेढा], श्रीनिवास दत्तात्रय वागज[ रा. शेटफळ] या पाच जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एम.एस.सानप या करीत आहेत