पिक विम्याचे वाटप सुरू

 रिपोर्टर ... : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांनी खरीप हंगामामध्ये पिक विमा कंपनीकडे पिकांचे संरक्षण म्हणून विमा भरला असल्यामुळे त्याचे नुकसान भरपाई पोटी विमा कंपनीने जिल्हा बँकेला पिकविम्याची रक्कम दिली असून त्या रक्कमेचे नियोजनबद्ध वाटप करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बँकेच्या कार्यकारी संचालकांनी दिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सभासद खरीप हंगाम २०१५-१६ साठी पिक विमा नुकसान भरपाई पोटी कंपनीकडून रू.४५५.४६ कोटी नुकसान भरपाई बँकेस प्राप्त झालेली आहे. विमा कंपनीकडून शाखांंतर्गत पीक निहाय व सभासद निहाय मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात याद्या तयार करणेव विमा लाभाथ्र्यांच्या खाती रक्कम जमा करण्यासाठी विमा कंपनीने १५ दिवसाचा कालावधी दिलेला असताना या बँकेने रक्कम प्राप्त झाल्यापासून ६ व्या दिवशी प्रत्यक्ष विमा रक्कम वाटपास सुरूवात केलेली आहे. 

विमा वाटप सुरूवात केल्यानंतर जिल्ह्यातील निराधार योजनेचे रू. ३ कोटी वाटप जिल्ह्यामध्ये २ दिवसात पुर्ण करून पुर्ववत विमा वाटपाचे काम योग्य नियोजनाद्वारे चालू आहे. दि. ८ जून रोजी अखेर रू. ४५५.४६ कोटीचे शाखांना मंजुरी पत्र दिले आहे. शाखास्तरावर लाभधारकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यांचे काम युद्ध पातळीवर चालू असून शाखास्तरावर रक्कमेचा जमाखर्च झाल्यानंतर गाव निहाय, वाटपाची यादी शाखेच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात येणार आहे. 

सदरील विमा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेला असून इतक्या मोठ्या प्रमाणात रोखड उपलब्ध करण्यासाठी बँक प्रशासनाने योग्य नियोजन केलेले असून सर्व शाखांना रोखड पुरविण्यासाठी बँकेने स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व विमा लाभाथ्र्यांना पेरणीपुर्वी विमा नुकसान भरपाईची रक्कम त्यांना मिळवण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील आहे. तेव्हा जिल्ह्यातील विमा लाभाथ्र्यांनी कोणत्याही भूलथांपाना बळी न पडता बँक प्रशासनाने शाखास्तरावरून गावनिहाय वाटपाचे केलेल्या नियोजनानुसार त्या त्या तारखेस गावातील विमा लाभधारकांनी शांततेत रक्कम प्राप्त करून घ्यावी असे आवाहन कार्यकारी संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.