सावकारांच्या जाचामुळे व्यापारी जिवन संपविण्याच्या मार्गावर...मुख्यमंत्रयांना दिले निवेदन..


 रिपोर्टर.. सावकरांनी सुरु केलेला जाच थांबवण्यासाठी पोलीसांकडे धाव घेवुनही कसलाच उपयोग न झाल्याने अखेर वैतागलेल्या व्यापा-याने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली असुन सावकरांनी सुरु केलाला जाच थांबवा अन्यथा 19 जुलै रोजी उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आत्मदहन करुन जिवन संपवणार असल्याचा इशारा थेट मुख्यंमत्र्यांनाच व्यापा-याने निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे परंडा तालुक्यात बोकाळलेली अवैध सावकारी बोकाळली समोर आली आहे.घेतलेल्या रकमेची व्याजासह रकमेची परतफेड करूनही पुन्हा आगावू पैसे मागणा-या २० खासगी सावकारांची यादीच व्यापा-याने मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. 
परंडा तालुक्यात फोफावलेला अवैध सावकारीचा व्यवसाय आता सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गाला देखील अडचणीत आणत आहे. अवैध सावकारीवर दुष्काळग्रस्त परिस्थितीतही प्रशासनाचे नियंत्रण नाही. परिणामी सावकाराकडून घेतलेले पैसे व्याजासह फेडूनही पुन्हा पुन्हा पैशाची मागणी वारंवार केली जाते. परंडा येथील व्यापारी अभिजीत पेडगावकर यांंच्यासह त्यांच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी एका सावकाराने दिली आहे. याबाबत पेडगावकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून जाच थांबवा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. व्यापारी अभिजीत पेडगावकर यांना धमकी देणा-या अवैध खासगी सावकाराविरूध्द कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी परंडा पोलिसांकडे पत्र दिले आहे. परंडा पोलिसांनी खासगी सावकारांना बोलावून चौकशी केली. चौकशीनंतर हे सावकार पुन्हा पेडगावकर यांना आमचे पैसे दे, अशा कितीही तक्रारी केल्या तरी आमचे काहीही वाकडे होणार नाही. परंतु तुझे कुटूंब संपवून टाकू, अशा धमक्या हे सावकार देऊ लागले आहेत. 
त्यामुळे परंडा तालुक्यात खासगी सावकारांची टोळी किती मुजोरपणाने धमकावते याचा प्रत्यय येतो. सावकारांच्या जाचामुळे अनेकजण गाव सोडून गेले आहेत. अवैध व विना परवाना सावकारीचा बिमोड करण्यासाठी शासनाने सावकारी अधिनियम 2014 पारीत केला आहे. तरी तालुक्यात खासगी सावकारांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रत्येक खेडेगावात खासगी सावकारी करणा-यांची संख्या वरचेवर वाढतच आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोरगरीब लोकांकडून वारेमाप व्याज लावून लुबाडणूक करणा-या अवैध सावकारीला आळा घालावा, अशी मागणी व्यापारी व्यापारी वर्गातुन होत आहे.