
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन ऑल आऊट दि 23 जुन रोजी राबवण्यात आले. या मध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील गुन्हेगार वस्त्या चेक करण्यात आल्या. यामध्ये फरारी आरोपी, पाहीजे असलेले आरोपी, फेरअटक आरोपी, अजामीन वॉरंट मधील आरोपीचा शोध घेण्यात आला. या ऑपरेशन मध्ये विविध ठिकाणातील 4 फरारी आरोपी 42 अजामिनपात्र वॉरंट मधील आरोपी तसेच तपासावरील गुन्ह्यातील निष्पन्न झालेले 6 आरोपी पोलीसांना सापडले. त्यांना अटक करण्यात आली असून तसेच या ऑपरेशन दरम्यान भूम तालुक्यातील गावठी हातभट्टीच्या अड्यघावरही कार्यवाही करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली घाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजतीलक रोशन, चंद्रकांत खांडवी आदींनी सहभाग नोंदवला.