दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांनी दाखविलेल्या धैर्याला सलाम - पालकमंत्री डॉ.दीपक सावंत

उस्मानाबाद : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे, मान्यच आहे मात्र या दुष्काळी परिस्थितीतही येथील शेतकऱ्यांनी दाखविलेल्या संयमाला आणि धैर्याला माझा सलाम, असे उद्गागार पालकमंत्री डॉ.दीपक सांवत यांची दुष्काळी गावांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी काढले.

वाशी, उस्मानाबाद, परंडा, कळंब, तुळजापूर, लोहारा या तालुक्यातील पारगाव, नांदगाव, वाशी, भोत्रा, खासगाव, वांगी, सापनाई, वडगाव, काक्रंबा, माकणी, राजेगाव आणि नारंगवाडी या गावातील दुष्काळी उपाययोजनांच्या व जलसंधारणाच्या झालेल्या कामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या सोबत आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, ओमराजे निंबाळकर जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ.सावंत यांनी यावेळी चारा छावणीस भेट देवून शेतकऱ्याशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. ते म्हणाले, जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान सुरू आहे. शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, ज्या ज्या योजनेचा लाभ शेतऱ्यांना देता येईल तो त्यांना दिला जाईल. लवकरच 250 जनावरांच्या छावणीला परवानगी देता येईल का ? याचाही निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री.सावंत म्हणाले, या दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. लोकसहभागातून निस्वार्थी भावनेने इथल्या जनतेने, लोकप्रतिनिधींनी आदर्शवत वाटावे असे काम केले आणि त्याला प्रशासनाने दिलेली साथ खरोखरीने अभिनंदनीय आहे. आता सर्वांना पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. निश्चितच यावर्षी चांगला पाऊस पडेल आणि हा दुष्काळ शेवटचा असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या दौऱ्यात प्रांताधिकारी तेजस चव्हाण, सचिन बारावकर श्रीरंगी, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.माले, डॉ.गलांडे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.देवकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे श्री.रेड्डी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.मुकणे, जिल्हा कृषी अधिक्षक शिरीष जमदाडे आदी उपस्थित होते.
निसर्गाची अनिश्चितता समजून घेवून त्यावर मात केली पाहिजे

दुष्काळी उपायोजनांची जलसंधारणाच्या कामांची पाहणी करतेवेळी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी ॲक्सिस बँक व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरपंच परिषदेलाही आवर्जून हजेरी लावली उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील सर्व सरपंच जलपूर्ती अभियान, आता पुन्हा नको दुष्काळाला सुकाळ या कार्यशाळेस एकत्र जमले होते.

पालकमंत्री डॉ.सावंत यांनी यावेळी उपस्थित सरपंचाना मार्गदर्शन करतांना सांगितले, सरपंच हा गावाचा कुटुंबप्रमुख असतो. त्यांची भेट महत्वामाचीच आहे. गावातील शेतकऱ्यांनी निसर्गाची अनिश्चितता समजुन घेवून पीक पॅटर्नचा अभ्यास करावा शेतकऱ्यांनाही कौशल्य विकास अभियानांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल तसेच दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच त्यानुसार शासन योग्य ती पावले उचलत आहे. ते पुढे म्हणाले सरपंचांनी या कार्यशाळेत त्याला जी माहिती सांगितली जाईल, ती त्यांनी गावात जावून आपल्या शेतकरी बांधवानाही सांगावी एकत्रितपणे गावातील दुष्काळ हटविण्यासाठी, गावच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.

या कार्यशाळेस जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा कृषी अधीक्षक शिरष जमदाडे, ॲक्सिस बँकेचे प्रादेशिक उपाध्यक्ष अजमकुमार हिंगे, तहसिलदार सुभाष काकडे, काशिनाथ पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत रोडे, राजीव बुबने, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, विकास खिल्लारे तसेच सचिन सुर्यवंशी, जयंत पाटील, पांडुरंग आव्हाड यांनी परिश्रम घेतले कार्यशाळेच्या सुरुवातीस प्रचार्य बिपीन दास यांनी पालकमंत्री डॉ.सावंत व अन्य उपस्थित मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले.