. नंदुरबार मध्ये कॉपी जोरात

रिपोर्टर..  नंदुरबार जिल्ह्यातील कॉप्यांचे सत्र  थांबण्याचे  नाव घेत नसुन आता तर चक्क पर्यवेक्षकांच्या समोर कॉप्यांसाठी विद्यार्थी पुस्तेक आणि गाईडचा वापर करत असल्याची भयावह बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील शहादा शहरात असणाऱया विकास हायस्कुल मध्ये इंग्रजीच्या पेपरला हा सारा प्रकार सऱहास खुलेआम पणे सुरु होता.  या ठिकाणी १० वी चे परिक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थीनी चक्क पुस्तक गाईडांमध्ये पाहुन पेपर सोडवत होते. तर या शाळेत खुलेआम कॉप्यांच्या झेरॉक्स विद्यार्थ्यांपर्यत पोहचत असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पर्यवेक्षकांसमोर सुरु असतांना तेच विद्यार्थ्यांकडे कानाडोळा करत मदत करत असल्याचेही समोर आले आहे. तर शाळेतील वर्गांच्या खिडक्यांबाहेर तर कॉप्यांचा खच पडलेला दिसुन आला. यावरुनच नंदुरबार जिल्ह्यात बाह्या कॉपी बंद झाली असली तरी अतंर्गत असलेली यंत्रणाच कॉप्यांना मदत करत असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.