अपघातात तीन जन जागीच ठार

नंदुरबार :- नावापुर तालुक्यातील विसरवाडी खांडबारा रोड वर  विसरवाडी गावाजवळील पुलावर टँकर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन चाकी अपेरिक्षा मध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जन जागीच ठार झाले असून दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत
         भरडू गावातील गवंडी काम करणारे मजूर सकाळी रिक्षाने विसरवाडी येथे होते तर विसरवाडी कडून येणाऱ्या टँकर चालकास वळणावर रिक्षा न दिसल्याने भरधाव टँकर ने या रिक्षाला धडक दिली ती इतकी भीषण होती कि तिच्यात रिक्षाचा चक्काचूर झाली आहे यात तीन जनाचा जागीच मुर्त्यू  झाला तर दोन जन जखमी झाले आहेत जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या वर उपचार सुरु आहेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणातसुरु असून त्याचा कडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे अपघातात एकाच गावातील तिघांचा मुर्त्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे