सात महिण्याच्या मुलीसह पती—पत्नी ची आत्महात्या.

 रिपोर्टर.. 
सात महिन्यांच्या चिमुकलीसह शेतकरी पती -पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 26) दुपारी उघडकीस आली. घारगाव शिवारात आत्महत्या केलेले लिमकर कुटुंब दुधी (ता. परंडा) येथील आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
दवाखान्यात जाण्यासाठी जयहिंद महादेव लिमकर (वय 35) पत्नी कल्पना (वय 28) हे सात महिन्यांची मुलगी राधासह शुक्रवारी सकाळीच दुधीहून परंड्याकडे सायकलवरून निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास एके ठिकाणी पाणी पिऊन ते घारगावकडे निघाले होते, असे काहींनी सांगितले. घारगाव शिवारातील विक्रम माळी यांच्या विहिरीत आज तिघांचे मृतदेह आढळले. विहिरीजवळ विषारी औषधाची बाटली, सायकल आढळली. क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. दुष्काळी स्थिती, नापिकीला कंटाळून त्याने पत्नी, चिमुकलीसह जीवन संपविले असावे, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. असे असले तरी त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.